28.2.1997
शांततेच्या पाटीवर गिरगटलं
जातंय सतत काहीतरी.. त्या विषयीची नोंद घेतली जातेय. पण उमेद खचवण्याइतकी खंत करत
नाहीए. उमटूदेना काहीही. पुसलही जाईल आपोआप..! माझ्यात येऊन धडकूदे काहीही. मी
त्याच्यात गेले नाही की झालं!
काल फिरायला गेले
तेव्हा रस्त्यात जागोजाग पडलेल्या खड्ड्यात पाणी साठलेलं दिसलं. कावळे.. कुत्री
पाणी पीत होती. ते बघून मनात आलं की या विश्वाच्या अस्तित्वातल्या प्रत्येक
लहानातल्या लहान घटकाचाही काही उपयोग आहे. त्याचं असं काही कार्य आहे. प्रत्येक
घटना, कृती कधीच व्यर्थ जात नाही. ती आपलं काम करतच असते. प्रश्न आपण ती जमेत धरतो
की नाही याचाच असतो फक्त..!
हा आशय
मनात घोळत राहिला... कवितेच्या वहीत लिहिलं गेलं-
‘कोई भी
जगह खाली नहीं होती
कोई भी
चीज बेवजह नहीं होती
हर चीज
का कुछ न कुछ मकसद होता है
जीने का
अपना अपना अंदाज होता है..!’
No comments:
Post a Comment