१५.२.९७
आज धूमकेतू दिसणार
असं कळलं म्हणून सकाळी अगदी लवकर डोंगरावर गेलो. धूमकेतू दिसला नाही. पण इतक्या
लवकर टेकडीवरचं वातावरण अनुभवताना छान वाटलं.
कितीही लवकर आपण
उठलो तरी आपल्या आधी कुणीतरी उठलेलं असतं! कितीही उशीर केला आपण तरी आपल्या मागे
कुणीतरी असतंच. आपण अनेकात एक असतो नेहमी..
आपली क्षमता पूर्ण
ताणून इप्सित ठिकाणी पोचल्यावर पुढं काय? तसं आपण पोचत पोचतच नाही कधी पण पोचलोच
तर ( नाथाघरच्या उलट्या खुणा ) पुढे काय? याचं एक छान उत्तर ज्ञानेश्वरीत दिलंय...
‘म्हणौनि कर्म न संडावे । विशेषे आचरावे । लागे संती॥ संतपदाला पोचल्यावरही
सर्वसामान्यांची दिनचर्याच नव्या दृष्टीतून जगणं, सर्वांमधे, सर्वांबरोबर असणं ही
खूप कसोटी लागणारी गोष्ट आहे. इथे जोनाथन सीगलचं परत आपल्या भावंडात येणं आठवतंय.
हे मोठं स्केल आपल्या जगण्यासाठी एक प्रतिक आहे..!
No comments:
Post a Comment