11.2.1997
आकलन किती अनंत आहे. Infinite.
आणि आपण एवढेसे.. finite..! सगळं एकत्र
एकावेळी नाहीच कळणार आपल्याला. एक कळून दुसरं कळेपर्यंत पहिलं कळलेलं बदललेलं
असतं. आपण आपल्या एवढ्याशा विश्वात मस्त राहावं. पायरीवर चढून खेळ करणार्या
मुलासारखं. त्याच्या दृष्टीनं ती पायरी आणि उडी मारणं एवढंच अस्तित्वात असतं..!
आज एक वाक्य वाचलं-
‘In
order to raise your standard you must keep Agni, the Soul’s flame of
transformation burning in you.’ Agni ला Agony हा शब्द किती जवळचा आहे ना?
***
13.2.1997
आज लवकर जाग आली. नीट आवरून झालं. फिरायला
गेले तेव्हा मनात आलं, प्रत्येक कणाचं, प्रत्येक क्षणाचं काही ना काही विहीत कार्य
आहे, त्याची अशी काही एक भूमिका आहेच या विश्वनाट्यात. या फिरत्या रंगमंचावर सूक्ष्मपणे
अव्याहत बदलतंय सगळं. रंगमंच सुद्धा..
No comments:
Post a Comment